ह्या ५ गोष्टींचा अवलंब करून तुम्हाला वाटणाऱ्या अनेक अशक्यतांना शक्यतेत उतरवा भाग- 2
मी अनेक बाबतीत योग्य निर्णय घेवून त्याचा पाठपुरावा करून ती गोष्ट शक्य करू शकत नाही ,असे तुम्हाला वाटते का ? ह्या प्रश्नाचे उत्तर जर ' हो' असेल तर नक्कीच माझ्या हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच. माझ्या ह्या ब्लॉगचा पहिला भाग मी हयाअगोदरच प्रकाशित केला आहे तो तुम्ही वाचला नसेल तर नक्कीच वाचून घ्या. U.S. मधील बारा वर्षीय Sparsh Shah ह्या मुलाने अनेक विक्रम केलेत हे आपल्यासाठी नक्कीच नवीन नाही. मात्र तो मुलगा जन्मतःच 45 पेक्षा जास्त फ्रॅक्चर शरीरात घेऊन जन्मला होता. त्याने जगातल्या अनेक अशक्यतांना शक्य करून दाखवले आहे. तो 10 पेक्षा जास्त गाणी लिहिली आहेत जी खूप पॉप्युलर झाली आहेत. भारतीय शास्त्रीय गायन तसेच अमेरिकन पॉप संगीतात त्याने आतापर्यंत गायलेली अनेक गाणी सुप्रसिद्ध झाली आहेत. तो एक Rapper, Singer, Motivational Speaker, Songwriter आहे. Sparsh Shah ने अनेक अशक्यतांना शक्यतेत आणले आहे. तुम्हालाही तुमच्या अनेक अशक्यता शक्यतेत आणायच्या असतील तर खालील 5 गोष्टींचा दररोज अवलंब करायला सुरुवात करा. 6}दररोजच्या कामांचे नियोजन करा : ...