खेळाडूंचा 'प्रत्येक सामना एक अमूल्य क्षण कसा व्हावा' हयाबद्दलच्या जबरदस्त टीप्स
सामने खेळण्यापूर्वी तुम्ही अस्वस्थ, चिंताग्रस्त होता काय ? सामने खेळण्यापूर्वीच 'माझ्या हातातून हा सामना सुटला' अशी भीती तुम्हाला वाटते काय ? ह्या दोन प्रश्नांची उत्तरे जर 'हो' असतील तर नक्कीच माझा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच. नमस्कार मी माया दणके, माझे मिशन आहे येत्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून शंभर खेळाडू पाठवणे. "सामने खेळताना नियोजन करणे, प्रत्येक सामन्याचा आनंद घेणे, प्रत्येक सामन्यागणिक स्वत:ची व सहकाऱ्यांची कामगिरी वाढण्याबद्दल काळजी घेणे तसेच सामना व स्पर्धा संपल्यावर भावनांवर नियंत्रण ठेवणे, इतर खेळाडुंचे कौतुक करणे व पुढील स्पर्धेसाठी आठवणी जोपासणे" ईत्यादी गोष्टी डॉ.अमित प्रभू खेळाडूंचे मानसशास्त्रज्ञ यांनी ऑनलाइन महाराष्ट्र राज्य खो खो संघटना आणि परभणीतील शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खो खो प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या कार्यशाळेत खेळाडूंना मार्गदर्शन करताना स्पष्ट केल्या आहेत. खरेच तुम्ही जर तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून सामने खेळत असाल तर नक्कीच तुम्ही त्या सामन्यास प्रामाणिकपणे न्याय देता आहात...