स्वतः ची self image कधी पाहिली आहे का ??
मी बर्याच लोकांच्या तोंडून ऐकले आहे की, स्वतः वर प्रेम करणे, स्वतः ची काळजी करणे, ही कृती स्वार्थीपणाची आहे. परंतु ही प्रक्रिया तुम्हाला स्वार्थी बनवत नाही, तर तुमच्या स्वतः च्या अंतर्बाह्य आकृतीबद्दल आस्था निर्माण करणारी एक खूप चांगली प्रक्रिया आहे. तुम्ही स्वतः वर अगोदर जेवढे जास्त प्रेम करायला शिकाल तेवढेच जास्त प्रेम तुम्हाला इतरांबद्दल वाटायला लागेल. तुमच्या स्वतःची self image कशी विकसित करायची ? हे जाणून घ्यायचे असेल, तर नक्कीच माझा हा ब्लॉग तूमच्यासाठीच. नमस्कार, मी माया दणके माझे मिशन आहे की, २०२४ च्या Paris Olympics ,मध्ये महाराष्ट्राच्या मातीतून १०० खेळाडू पाठवणे. स्वतः ची प्रतिमा तुम्ही अशा वेगवेगळ्या चष्म्यातून पाहत असता. १.सगळ्यात पहिले तर, स्वतः ची image मला इतर लोक काय समजतात तोच मी आहे. ही प्रतिमा तुम्ही स्वतः तुमच्या मनात तयार केलेली असते. २.मी मला काय वाटतो तीच माझी स्वतः ची प्रतिमा आहे. ३.माझे घरातील व्यक्ती मला काय समजतात तीच माझी प्रतिमा आहे. ४.मी नौकरीच्या ठिकाणी, समाजात, नातेवाईकांमध्ये काय आहे ही माझी स्वतः ची प्रतिमा आहे. ह्या सगळ्यांच्या गराड्...